कन्नड, (प्रतिनिधी) नगर परिषद सार्वत्रिक वडणुकीसाठी प्रारूप यादी घोषित रण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या माणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आहे. याबाबत चौकशी करून बंधितावर कारवाईची मागणी माजी परसेवक संतोष पवार यांनी सक्षम धिकारी तथा मुख्याधिकारी च्याकडे केली आहे.
प्रारूप मतदार यादीत मोठ्या नाणात गैरप्रकार झालेला आहे. षित प्रारूप वॉर्ड रचनेतील वॉर्डचे की बाहेरील मतदारांचे नाव प्रारूप नदार यादीत समाविष्ट केले आहे. रूप मतदार यादीत मतदारांचे लांतर बाबत कार्यवाही करताना काच पत्त्यावर शेकडो मतदारांचा बास दाखवला आहे. काही आधार शासनाची दिशाभूल करण्याकरीता एकाच पत्त्याचे काही ठिकाणी आधार, काही ठिकाणी लाईटबील, तर काही ठिकाणी पाणी पट्टीचे पुरावे जोडून मतदारांची नावे समाविष्ट केली गेली आहे,
असा आरोप पवार यांनी केला. आता मतदार समविष्ट करणे बाबत पंचनामा कारवाई सुरू करण्यात आलेली असून, हादेखील नवीन मतदारांचे बेकायदा समावेशाकरीता केलेला फार्स आहे. या प्रकारे कन्नड नगर परिषदेचे प्रारूप मतदार यादीत बेकायदा नावे समाविष्ट करणे, एकाच पत्यावर शेकडो नावे समाविष्ट करणे; तसेच चुकीच्या पंचनामा आधार नाव समावेश करणे, असे प्रकार समोर आले आहेत.
याबाबत दोषी घरमालक व ज्याचे पत्ते वापरले, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, एकाच पत्त्यावर वेगवेगळ्या पुराव्या आधारे वेगवेगळे मतदार समाविष्ट करणे, आधार कार्डमध्ये बदल या बाबत चौकशी करून दोषी अधिकारी व खोटे, बनावट व मॉर्फ डॉक्युमेंट जोडणारे मतदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक संतोष पवार यांनी केली.